Posts

Showing posts from January, 2022

किस्से_पोस्टमनचे हयातीचा_दाखला

त्यादिवशी बांगरवस्तीवर गेलो होतो..पवार आज्जींनी कोंडे तात्यांकरवी सांगावा धाडला होता..' तात्या ,त्या पोश्ट्यामनं पोराला म्हणावं म्या बोलीवलयं घरी..आन ज्यावानं करुन येवं नगं म्हणावं..' कोंडे तात्यांच पोस्टात नेहमी येणं-जाणं असायचं..शनिवारी असचं ते आले असता त्यांनी मला हा निरोप सांगितला..कामाच्या धांदलीत मी विसरून गेलो..सोमवार उजाडला खरा पण आठवड्याचा पहिला दिवस असल्याने टपालाचं प्रमाण खूप असतं..त्यामुळे तोही दिवस आज्जींची आठवण न काढताच गेला.. आज्जी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या..मंगळवारी न चुकता मी आज्जींकडे गेलो..आज्जींना एकुलता एक मुलगा3 Full stopघरची दोन एकर जमीन.. आईबापाचं अन् बायकोचं पटत नव्हतं म्हणून तो वेगळा राहतं होता..गावात चर्चा नको म्हणून आज्जींनी तेही सहन केलं3 Full stopतुटपुंज्या पेंशनवर दिव्यांग नवर्याचं खाणं-पिणं,दवाखाना या गोष्टी ती कशाबशा भागवत होती..स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता..त्या आपल्या पेंशनर पतीसोबत आयुष्यातील उर्वरित दिवस कसंबसं काढतं होत्या.. पती जरूर पेंशनर होते परंतु त्यांचे पाय निकामी झालेले होते..वाचा गेलेली होती..हगणं-मुतणं जाग

पांडुरंग

Image
पांडुरंग , पैठण गावात जे नाथांचं मंदिर आहे , त्यांच्या देवघरात सर्वात वर तुळशीचं माळ घातलेली पांडुरंगाची मूर्ती आहे ती सदैव फुल वस्त्र अलंकाराने झाकलेली असते त्यामुळे मूर्तीचे फक्त मुखकमल दर्शन होत असते वास्तविक या मूर्तीचे एक वेगळे वैशिष्ट्य आहे...  आपण सहसा पांडुरंगाची मूर्ती दोन्ही हात कमरेवर ठेवून उभा असलेला पांडुरंग पाहतो पण या मूर्तीत पांडुरंगाचा डावा हात कमरेवर आहे तर उजवा हात कमरेच्या खाली आहे पण समोरच्या बाजूला उघडणारा तळवा किंवा तळहात दिसतो.... म्हणून त्याला" विजयी पांडुरंग" असे म्हणतात.  या विजयी पांडुरंग कसा याची एक सुंदर आख्यायिका आहे ,हा भगवंत नाथांना प्रासादिक रुपाने मिळालेला आहे ही मूर्ती दिडफुट उंचीची आणि अडीच किलो वजनाची पंचधातूंपासून बनवलेली मूर्ती आहे कर्नाटकातील राजा रामदेवराय हा पंढरपूरच्या पांडुरंगाचा उपासक होता त्यामुळं त्याने मंदिर बांधलं आणि सोनारकरवी पंचधातूंची मूर्ती बनवून घेतली आणि त्याची प्राणप्रतिष्ठा करणार तोच पांडुरंग दृष्टांत देऊन त्यांना म्हणाला  "माझी ही मूर्ती तू इथे स्थापलीस तर मी इथे राहणार नाही आणि माझ्या इच्छे विरुद्ध