किस्से_पोस्टमनचे हयातीचा_दाखला




त्यादिवशी बांगरवस्तीवर गेलो होतो..पवार आज्जींनी कोंडे तात्यांकरवी सांगावा धाडला होता..' तात्या ,त्या पोश्ट्यामनं पोराला म्हणावं म्या बोलीवलयं घरी..आन ज्यावानं करुन येवं नगं म्हणावं..'

कोंडे तात्यांच पोस्टात नेहमी येणं-जाणं असायचं..शनिवारी असचं ते आले असता त्यांनी मला हा निरोप सांगितला..कामाच्या धांदलीत मी विसरून गेलो..सोमवार उजाडला खरा पण आठवड्याचा पहिला दिवस असल्याने टपालाचं प्रमाण खूप असतं..त्यामुळे तोही दिवस आज्जींची आठवण न काढताच गेला..


आज्जी माझ्या वाटेकडे डोळे लावून बसल्या होत्या..मंगळवारी न चुकता मी आज्जींकडे गेलो..आज्जींना एकुलता एक मुलगा3 Full stopघरची दोन एकर जमीन.. आईबापाचं अन् बायकोचं पटत नव्हतं म्हणून तो वेगळा राहतं होता..गावात चर्चा नको म्हणून आज्जींनी तेही सहन केलं3 Full stopतुटपुंज्या पेंशनवर दिव्यांग नवर्याचं खाणं-पिणं,दवाखाना या गोष्टी ती कशाबशा भागवत होती..स्वतःकडे लक्ष द्यायला तिला वेळच नव्हता..त्या आपल्या पेंशनर पतीसोबत आयुष्यातील उर्वरित दिवस कसंबसं काढतं होत्या..


पती जरूर पेंशनर होते परंतु त्यांचे पाय निकामी झालेले होते..वाचा गेलेली होती..हगणं-मुतणं जागेवरचं होतं..आज्जी राहत होत्या ते घरही भाड्याचं होतं..मी घरात पाऊल ठेवताच घरातून मुताचा उग्र दर्प आला..बाबा मोडकळीस आलेल्या खाटावर पहुडले होते..मला पाहताच ते उठण्याची धडपड करु लागले..मी त्यांना ' पडा बाबा तुम्ही3 Full stop मी बसतो..' म्हटलं तेव्हा त्यांची हालचाल मंदावली..


मी टपालाच्या थैली सोबत खाली बसलो..तेवढ्यात आपले धुण्याचे हात पदराला पुसत आज्जी आल्या..जूनी जीर्ण झालेली ,काष्टा घातलेली नऊवारी साडी..तोंडात पहिल्या फळीतल्या दातांनी केव्हाच साथ सोडलेली..हातात नावालाच उरलेल्या बांगड्या..घरात गरजेपुरत्याही नसलेल्या वस्तू..तरीही आज्जी कायम हसतमुख असायच्या..कपाळावर घट्ट चिकटून बसलेली टिकली आज्जी आपल्या व्रुद्ध पतीला किती जपतात हेच दर्शवत होती..मला खाली बसलेलं पाहून आज्जी हळहळतं म्हणाल्या..' आयो3 Full stopआयो..ह्यवढा मोठा तू पोश्ट्यामनं3 Full stop आन मह्या घरात खाली बसतूयं ?4 Full stopमहं म्हतारं शिव्या न्हायं द्याचं व्हयं मला..? '


' आज्जी4 Full stop मला गादी काय अन् भुई काय..दोन्ही सारखेचं3 Full stop' मी आज्जींना नको म्हणणार तोच त्यांनी कोपर्यातून एक पोतं काढून मला बसायला दिलं3 Full stopभिंतींवर लटकलेल्या मांडणीतून एक ताट काढून त्यांनी त्यात बटाट्याची भाजी अन् दोन चपात्या माझ्या पुढ्यात ठेवल्या..' जेव बाबा3 Full stopतसं तर तुला मटाणचं करणार व्हते पण पैशे3 Full stop' तोंडावर एक हात ठेवत आणि बळेच हसतं आज्जींनी वेळ मारून नेली..मी खरतरं नाही म्हणूच शकलो नाही3 Full stop आज्जी एवढ्या अडचणीत असूनही त्यांनी मनमोकळेपणाने एवढं सगळं करणं कौतुकास्पद होतं..मी ' अन्न हे पुर्णब्रम्ह ' मानतं जेवणं संपवलं..आज्जी आग्रह करत होत्या..परंतु मलाही घाई होती4 Full stop


मी आज्जींना मला बोलवण्याचं कारण विचारले.. आज्जी म्हणाल्या..' दोन महिणं झालं..पेंशन न्हायं मिळाली..ते तसलं अंगठा घ्यायचं करायचं राह्यलंयं..आता म्हतारा तरं कुठं न्याच्या सोईचं न्हायं राह्यलं..आधी जमत व्हतं3 Full stopआता बगं गड्या मह्यासाठी3 Full stopमला पेंशनचाच आधार हाय..' मी आज्जींचा निरोप घेतला आणि पत्रं वाटू लागलो..लागलीच सुशील मास्तरांना फोन करुन विनंती केली..' मास्तरं3 Full stop आपल्या काही पेंशनरांचे हयातीचे दाखले काढायचे आहेतं3 Full stopआपला मोबाईल मागवून घेता आला तर पहा3 Full stop'


आमच्या पोस्ट ऑफिसचे नादुरुस्त मोबाईल दुरुस्त होऊन यायला वेळ लागणार होता3 Full stop' त्या पेंशनरांना आँफीसला येऊन हयातीचा दाखला काढावा लागेलं असं मास्तरांनी सुचवलं.. मी त्यांना पेंशनरांची अवस्था सांगितल्यावर मास्तरांनी लागलीच वाडेबोल्हाईच्या बीओआँफीसवरुन मोबाईल मागवला3 Full stopमाझी भ्रांत मिटली3 Full stopकारण एकटे पवार आजोबाच नव्हते तर चार पाच पेंशनर होते3 Full stopज्यांच खाटेवरचं जीवन चालू होतं3 Full stopत्या सर्वांची मला आग्रहाची आणि कळकळीची विनंती होती..जी मी कधीच डावलू शकत नव्हतो..


असेच जाधव मामा3 Full stopपण यांचा मुलगा गावात पुढारी.. कडक इस्त्रीचे कपडे घालून मिरवणारा..त्या दिवशी घरी गेलो तर म्हतारं हमसून हमसून रडू लागलं..' पोरा3 Full stopपेंशन पुरताच बाप दिसतो याला..' आणि खरचं3 Full stopदहा बाय दहाची एक कोंडाळ्यातली रुम ,त्यात एक खाट ,काही कपडे अशा अवस्थेत राहणारे जाधव मामा..!

तसेच दरगुडे अण्णा4 Full stop राहायला उच्चभ्रू सोसायटीत4 Full stopपण आपुलकीने बोलायला माणूस नाही3 Full stop मुलाला वेळ नसतो..तो रविवारी दिसतो3 Full stopएकाच घरात असून3 Full stop पेंशन, ताब्यात घेतली की महिनाभर त्याच दर्शन दुर्मिळ होतं..तशा सूनबाई असतातच3 Full stopपण त्यांना हे अण्णा म्हणजे नसतं लोढणंच वाटतं4 Full stop


या सर्वांमध्ये एक समान धागा म्हणजे यांचे हातपाय काम करत नव्हते3 Full stopमी मोबाईल आल्या आल्या भरभर पत्र वाटून घेतली3 Full stopतडक केसनंद गाठलं..तिथून भाऊ कोळपकरांना सोबत घेतलं..जाधव मामांचे अपडेटं केले..मग दरगुडे अण्णा3 Full stopपाटील अण्णा3 Full stopआणि सरतेशेवटी पवार आजोबांचे3 Full stopअसे करता करता सर्वांचेच हयातीच्या दाखल्याचे काम धसास लागले3 Full stopएव्हाना चार वाजले होते..या धावपळीत जेवण राहूनचं गेलं होतं..गावात एका ठिकाणी मी आणि भाऊ भेळं खाण्यासाठी थांबलो..आज मनाला खूप मोठं समाधान लाभलं होतं..


या सर्व आजोबांचे काम मार्गी लावून मी त्यांच्या अजूनच जवळचा झालो होतो3 Full stopवारंवार जाऊन माझे यांच्याशी आपुलकीचे नाते जडलेले3 Full stopजेव्हा यांच्याकडे जायचे असेल तेव्हा मी आवर्जून वेळ सोबत घेऊन जायचो3 Full stopकारण महिनाभर साठलेलं ते माझ्याजवळ मोकळं करायचे3 Full stopतसा मी त्यांच्या नातवाच्या वयाचा3 Full stopऐकून घ्यायचो..समजावयाचो..नकळत माझेही अश्रू लपवायचो..या सर्वांनी आपला आपला काळ गाजवला होता3 Full stopपोरांना सगळं सोईचं करुन ठेवलं होतं3 Full stopबदल्यात फक्त माया हवी होती..आपुलकीचे दोन शब्द हवे होते.. प्रेमाची पाखर हवी होती..


कुठेतरी या गोष्टी त्यांना दुरापास्त झाल्या होत्या..काही गोष्टी यांच्याही चुकतं असतील3 Full stop पण यांचे आयुष्य मावळीकडे झुकले आहे3 Full stopअशावेळी यांना लहान मुलांप्रमाणे जपायला हवं..समजून घ्यायला हवं..आपल्यासाठी केलेला त्याग आठवायला हवा..आपल्यासाठी न जाणो कित्येक सुखांचा त्याग केलेला असेल4 Full stopकाहीच आठवत नाही का आपल्याला3 Full stop? की सगळं समजून उमजूनही आपण निर्ढावलेलो आहोत ?3 Full stopउद्या आपणही या अवस्थेतून जाणारच आहोत3 Full stop

आपल्या आईवडिलांना त्यांच्या शेवटच्या काळात अशा पद्धतीने जपायला हवं..जसं की त्यांनी आपल्याला बालपणात जपलेलं असतं..


भेळं संपवून मी भाऊंना गावात सोडलं आणि पोस्ट ऑफिस जवळ करु लागलो4 Full stopआज मी समाधानाचे दुर्गम गड सर केले होते4 Full stop त्या वयस्कर व्यक्तींची होणारी परवड पाहून काळजाला असह्य वेदनाही झाल्या होत्या..पण एका प्रश्नाचा भुंगा डोक्यात सतत भुणभुणतं होता5 Full stop


आपल्याच माणसांना आपण नकोसं होण्याइतपत जगणं खरचं बेवारसं असू शकतं का ? आणि जर असं असेलं तर आपलं महत्त्व अधोरेखित करण्यासाठी वेळोवेळी " हयातीचा दाखला " सादर करावाच का ?


 लेखक

नामदेव सुखदेव, गवळी

9767041875

Comments